Tirupati Balaji Darshan Terms and Conditions :
तिरुपती बालाजी दर्शन नियम व अटी :
- बालाजी मुख्य मंदिरात दर्शनासाठी जाताना पुरुषांना लुंगी किंवा पांढरी पॅन्ट घालणे बंधनकारक आहे, शर्ट कोणताही चालेल.
- ( टी-शर्ट सोडून)
- बालाजी मुख्य मंदिरसह इतर सर्व मंदिरात महिलांना साडी, पंजाबी ड्रेस, चालेल. फॅन्सी ड्रेसची परवानगी नाही. लहान मुलींना सुद्धा फुल्ल ड्रेस आवश्यक आहे.
- ट्रिप मध्ये सर्व सदस्यांना सोबतच चालावे लागेल, मागे पुढे पळापळ करून चालणार नाही. (मुख्यतः मेन बालाजी मंदिर व इतर मंदिर दर्शनाला जाताना)
- मेन बालाजी दर्शनाला गेल्यानंतर जरी एखादी व्यक्तीने चुकीने मागे राहिली किंवा पुढे गेली तरी राम बगीचा बस स्टॉप पार्कींगला गाडी जवळ येऊन थांबावे, मोबाईल सोबत नसल्यास इतर कोणत्याही व्यक्तीचा मोबाईल घेऊन 9881777717 या क्रमांकावर कॉल करून गाडी बद्दल माहिती घ्यावी.
- तिरुमला डोंगरावर बिस्लेरी बॉटलला बंदी आहे त्यामुळे प्रत्येकांनी आपल्या कायमस्वरूपी वापरातील स्टील किंवा प्लॅस्टिकची पाणी बॉटल सोबत ठेवावी.
- तिरुमला डोंगरावरील सहा पॉईंट आहेत जिथे दर्शनासाठी जाताना किमान 500 मीटर चालत जावे लागते त्यामुळे ज्यांना चालणे शक्य नाही त्यांनी गाडीत बसने फायद्याचे राहील.
- मुख्य मंदिरात दर्शनासाठी जाऊन परत गाडीपर्यंत येईपर्यंत सर्वांना रांगेत 1 कि.मी. चालणे बंधनकारक आहे.
- ट्रिपमध्ये दिलेले ओळखपत्र गळ्यात ठेवणे बंधनकारक आहे. जेणेकरून दर्शन करून आल्यास, तसेच इतर वेळी मागे पुढे राहिल्यास त्या कार्डवर असलेल्या कंपनीच्या क्रमांकावर तसेच ट्रिप मॅनेजरच्या क्रमांकावर कॉल करून संपर्कात राहता येते.
- ट्रेन किंवा फ्लाईट लेट होणे किंवा दर्शनासाठी वेळ लागणे, प्रत्येक वेळी गेट चेंज करणे हे कंपनीच्या हातात नसते, मंदिर कमिटीच्या हातात असते त्यामुळे त्याला कंपनी जबाबदार राहणार नाही. दर्शन वेळ 1 ते 3 तास फिक्स असते त्या पेक्षा जास्त वेळ लागत नाही. अपवादात्मक एखादे वेळी काही कारणास्तव जास्त वेळ लागू शकतो.
- रेल्वे तिकीट झेरॉक्स, दर्शन पास झेरॉक्स, ओरिजिनल आधार कार्ड सोबत ठेवणे बंधनकारक आहे.
- मुख्य बालाजी मंदिर, पद्मावती मंदिर, गोविंदा मंदिर, या 3 मंदिरांचा दर्शन पास फक्त पॅकेज मध्ये समाविष्ट असेल ईतर कोणत्याही मंदिराचा पास पॅकेज मध्ये समाविष्ट नाही.(जुने बालाजी मंदिर, गणपती मंदिर, वेल्लोर सुवर्ण मंदिर, श्रीकाल हस्ती मंदिर)
- ट्रिप मध्ये मौल्यवान वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू गरजेनुसार वापरावेत, अनावश्यक वस्तू सोबत आणू नयेत, तसेच स्वतःच्या वस्तूंची स्वतः काळजी घ्यावी. अनावधानाने काही हरवल्यास कंपनी जबाबदार राहणार नाही.
- विमान बुकिंग कंपनी करून देते परंतु ‘पुणे – तिरुपती’ किंवा ‘मुंबई – तिरुपती’ थेट विमान नाही. बेंगलोरमार्गे किंवा हैद्राबादमार्गे विमान प्रवास करावा लागत असून या प्रवासामध्ये किमान 4 तासांचा हॉल्ट असतो. विमान कॅन्सल होणे किंवा वेळेत बदल होणे असे प्रकार बहुतांश वेळा घडतात त्यामुळे कंपनी ती जबाबदारी घेत नाही. प्रवाशांच्या जबाबदारीवर आम्ही बुकिंग देतो.
- तिरूमला डोंगरावर असलेले सहा पॉईंट दर्शन करूनच मुख्य दर्शनाला जावे, एखादे वेळी वेळ कमी असल्यास काही पॉईंट कॅन्सल करावे, पास वर दुपारी 1 ची वेळ असली तरी तुम्ही दुपारी 3 वाजेपर्यंत दर्शनासाठी मंदिरात जाऊ शकता.
- ट्रिप मध्ये दिलेली खरेदीची वेळ ही तिरूमला डोंगरावर मंदिर परिसरात खरेदी करण्यासाठीची आहे, ना कि तिरुपती शहरात.
- पूर्ण ट्रिप मध्ये बुलढाणा अर्बन येथे 2 वेळा जेवण व्यवस्था असेल, 1 वेळ साऊथ स्टाईल तिरूमला डोंगरावर असेल.
- तिरूमला & तिरुपती येथे ट्रिपमध्ये आपण राहत असलेल्या हॉटेलमधील कामगारांना कोणत्याही प्रकारची टीप देऊ नये, तसेच प्रवासात 2 दिवस सोबत असलेल्या ड्रायव्हरला पार्किंगसाठी किंवा जेवणासाठी पैसे देऊ नयेत, सर्व पेमेंट त्यांना अगोदरच केलेले असते. ते प्रवाशांकडून खोटे बोलून पैसे काढून घेतात. साऊथ मधील लोकांना तशी सवय आहे.
- ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार आपण कोणत्याही मंदिराचे दर्शन कॅन्सल करू नये, ज्या त्या वेळेनुसार आपण निर्णय घ्यावा, वेळ कमी असेल तर स्वतः सोयीस्कर वाटेल त्यानुसार कॅन्सल करावे. काही वेळा ड्रायव्हर वेळ असून कॅन्सल करतात त्यावेळी ट्रिप मधील सदस्य यांनी वेळ बघून निर्णय घ्यावा.
- हॉटेल रूममध्ये तसेच गाडीमध्ये कोणाला काही अडचण निर्माण झाल्यास किंवा ड्रायव्हर उद्धट वागत असेल अशा वेळी तत्काळ ऑफिसला कॉल करून सूचना करावी, त्यावर तात्काळ मार्ग काढला जाईल.
- प्रवासात भाविकांनी स्वतःसाठी लागणारी औषधे सोबत ठेवावी.
- मेन बालाजी मंदिरात दर्शनाला जाताना किंवा इतर कोणत्याही मंदिरात जाताना गाडी कमांक, ड्रायव्हर मोबाईल क्रमांक, पार्किंग लोकेशन एका कागदावर लिहून आपल्या सोबत ठेवावा जेणेकरून दर्शन झाल्यानंतर ड्रायव्हरशी तात्काळ संपर्क करण्यासाठी सोयीस्कर होईल.
- 10 पेक्षा जास्त भाविकांचा ग्रुप असेल तर ग्रुप सोबत स्पेशल ट्रिप गाईड उपलब्ध असेल.
- प्रत्येक पॅकेजच्या ट्रीपसाठी कमीत कमी 4 आणि त्यापेक्षा जास्त भाविक असतील तर भाविकांना हव्या त्या वेळेनुसार आणि तारखेनुसार स्वतंत्र ट्रिप दिली जाईल.
- बुकिंगसाठी 100% ऍडव्हान्स पेमेंट करावे लागेल (ऑनलाईन किंवा कॅश). सर्व पेमेंट आल्याशिवाय दर्शन पास आणि ट्रेन तिकीट पाठवली जाणार नाहीत.
- बुकिंग केल्यानंतर 45 मिनिटामध्ये भाविकांना दर्शन पास आणि ट्रेन तिकीट उपलब्ध करून दिले जाईल.
- आमच्या कंपनीकडून काही कारणास्तव बुकिंग रद्द झाल्यास भाविकांना त्याच दिवशी पूर्ण रक्कम परत केली जाईल.
- भाविकांकडून बुकिंग रद्द झाल्यास जमा रकमेच्या 50 टक्के रक्कम परत केली जाईल.
- ट्रीपमध्ये कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्तहानी झाल्यास कंपनी त्यास जबाबदार असणार नाही. भाविकांनी स्वतःची काळजी स्वतः घेणे आवश्यक आहे.
- वरील सर्व सुचनांचे भाविकांनी पालन करणे आवश्यक आहे ही विनंती.
- टीप :
- प्रत्येक पॅकेज मध्ये 4 वर्षांच्या आतील लहान मुले फ्री असतील, 5 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांचे पॅकेज च्या 70 टक्के पेमेंट भरावे लागेल, तसेच फ्लाईटच्या पॅकेजमध्ये 4 वर्षांच्या आतील लहान मुलांचे फ्लाईट तिकीटचे पैसे फक्त भरावे लागतील.
- सर्व पॅकेजमध्ये ज्या भाविकांना तिरुपती बालाजी दर्शन झाल्यानंतर आपल्या शहरात रिटर्न येण्याऐवजी कोल्हापूरला दर्शनाला जायचे असल्यास त्यांना कोल्हापूर रिटर्न तिकीट उपलब्ध करून दिले जाईल. कोल्हापूरमधील तसेच कोल्हापूर पासून पुढील प्रवासाची व्यवस्था पॅकेज मध्ये समाविष्ट नसेल, ती व्यवस्था भाविकांना स्वतःहून करावी लागेल.